Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २९ जानेवारी : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ३ व ४ ठप्प झाले आहेत. केंद्रात कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रत्येकी २१० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे हे दोन संच बंद ठेवावे लागत आहेत.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात केवळ दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. सध्या १७७४ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होत आहे. या केंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता २९२०  मेगावॅट आहे. तर केंद्राला दररोज ४५ हजार मेट्रिक टन कोळशाची गरज असताना सध्या केवळ ६० हजार मेट्रिक टन एवढाच कोळसा साठा उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या केंद्राला रोज केवळ २७ हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा केला जात आहे. नजीकच्या पद्मापूर कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा रखडल्याने ही स्थिती ओढविली आहे. ऐन हिवाळ्यात वीज निर्मिती कमी झाल्याने एकूण ग्रीडवर परिणाम होणार आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

 

Comments are closed.