Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. २९ जानेवारी : भाजपाचे नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी स्वतःच्या मानासाठी भर सभेत सरपंचांच्या फोनवरून ग्राम सेवकाला अश्लील शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाली. या प्रकरणी पाशा पटेल यांचा सर्व स्तरातून जाहीर निषेध व्यक्त केला जातोय.

काही दिवसा पूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे भाजप नेते पाशा पटेल यांची बांबू परिषद सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी ग्रामसेवक अमोल जाधव उपस्थित होते मात्र ही परिषद वेळेत सुरू न होता रात्री ९ वाजता सुरू झाली. ग्रामसेवक अमोल जाधव परिषद स्थळावरून रात्री ८ वाजता देगलूरला निघून गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाशा पेटल यांनी अमोल जाधव यांना शेळगावच्या सरपंचाच्या फोनवरून फोन केला. भर सभेत बोलत त्यांचा फोन स्पिकरवर ठेवला गेला होता. फोनवरून पाशा पटेल अमोल जाधव यांना परिषदेला उपस्थित राहिले नसल्याच्या कारणावरून अश्लील शिवीगाळ करू लागले.

अमोल जाधव यांनी पाशा पटेल यांना नम्रपणे समजावण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्यांनी काही एक ऐकून न घेता अमोल जाधव यांना अश्लील शिवीगाळ करत परिषदेच्या ठिकाणी तात्काळ येण्यास सांगितले तसेच न आल्यास आपण काय करनार हे त्यांनी परिषदेला उपस्थित असलेल्या सरपंचांना फोन सुरू असतानाच सांगितले. हे सर्व संभाषण सभेला उपस्थित असणाऱ्यांच्या समोर पाशा पटेल माईकवर बोलत असताना झाले असल्याचे ऑडिओ क्लिप मधून जाणवते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

Comments are closed.