Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि,२८ जानेवारी : एटापल्ली येथील सुरजागड लोहप्रकल्पाचे काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक अतुल खाडिलकर हे २४ जानेवारीला आलापल्ली येथील कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये झोपले असताना मध्यरात्री ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, भोजराज, जेडी नामक इसम आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी गेस्ट हाऊसच्या खोलीचे दार तोडून आज प्रवेश केला. त्यानंतर अतुल खाडिलकर यांना लाथाबुक्यांय नी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात खाडिलकर यांनी तक्रार केल्यानंतर अहेरी पोलिसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, भोजराज, जेडी व अन्य दोघांवर भादंवि ४५२, ३२३, १४३, १४७, ५०४, ५०६ व ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री.गव्हाणे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा ,

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद – गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

‘नायरा’ सामाजिक संस्थेने जिल्हापरिषद शाळेचा बदलला चेहरा…

जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Comments are closed.