Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘नायरा’ सामाजिक संस्थेने जिल्हापरिषद शाळेचा बदलला चेहरा…

प्रजासत्ताक दिनी शाळेत ध्वजारोहाणाचा मान देऊन ग्रामस्थांनी केला सामाजिक संस्थेचा सन्मान...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. २७ जानेवारी :  वसई तालुक्यातील विरार पूर्वेला असलेल्या भोये पाडा या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेचा ‘नायरा’ या सामाजिक संस्थेने चेहरा मोहरा बदलला आहे. पहिली ते चौथी पर्यंतच्या या शाळेच्या सर्व वर्ग खोल्या, कुंपण आणि कार्यालाची डागडुजी करून रंगरंगोटी केली. कोरोना काळात बंद असल्याने भकास असलेली शाळा आता एकदम नवी कोरी शाळा झाली आहे.

शिवाय या शाळेच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप केल्याने विध्यार्थ्यांसोबातच शिक्षक आणि गावकऱ्यांनी देखील नायरा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रोहन गायकवाड यांना प्रजासत्ताक दिनी शाळेत ध्वजारोहाणाचा मान देऊन त्यांचा सत्कार करत आभार मानाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पेशाने सायबर सिक्युरिटी तज्ञ असलेले रोहन गायकवाड यांची ‘नायरा’ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामील आणि दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य करत आहे. तसेच अनेक लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करीत आहे. कोरोना वसई तालुक्यातील भोये पाडा या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद काळात शाळा बंद असल्यामुळे अतिशय दुरवस्था झाली होती. शाळा पुन्हा सुरु करायची झाली तर, आधी शाळेची दुरुस्ती करणे गरजेचे होते.

त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि शिक्षांची अडचण श्रमजीवी संघटनेच्या सदस्यां मार्फत रोहन गायकवाड यांना कळली. त्यावेळी त्यांनी तातडीने दखल घेऊन आपल्या ‘नायरा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण शाळेचे नुतनीकरण केले. तसेच विध्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्याचे वाटप केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भोये पाडा जिल्हा परिषद शाळेने रोहन गायकवाड यांनी शाळेसाठी केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना ध्वजारोहाणाचा मान देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ रेंजड, उपाध्यक्ष आणि टोकरे खैरेपडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामचंद्र रोज, झोन प्रमुख सुभाष दादा, विलास मोरघे, विनोद मेघावले, आकाश बनसोडे, शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, विध्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद – गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई

 

Comments are closed.