Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असलेले कर्मचारी, वाहनचालक व निवृत्त चालक अशा ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. २९ जानेवारी : यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असलेले कर्मचारी, वाहनचालक व निवृत्त चालक अशा ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री काही लोक जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून धाड मारून ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये एक लिपिक, काही वाहनचालक, काही निवृत्त वाहनचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वाहन चालकाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. हा काही कालचाच प्रकार नाही, तर गेल्या कित्येक महिन्यांपासून तेथे काही मंडळी जुगार खेळतात. तेथेच या मंडळीचा मद्यप्राशनाचाही कार्यक्रम नियमित चालायचा अशी माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

 

Comments are closed.