Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून १४ शेळ्या मेंढ्या ठार; मेंढपाळ शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपयाचे नुकसान

शेतकऱ्याच्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडल्याने १४ शेळ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील वाघमोडेवाडी वस्ती येथे शेळ्या-मेंढ्याच्या काळपावर वीज पडून लहान मोठ्या १४ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास घडली.

चिंचोली वाघमोडे वस्ती येथील मेंढपाळ शिवाजी विष्णू गडदे यांचा शेळ्यामेंढ्या पालन व्यवसाय आहे. त्यांनी शनिवारी दिवसभर शेळ्या-मेंढ्यांना चारून सायंकाळी ६ च्या सुमारास घरा शेजारील वाडग्यात कोंडल्या होत्या दरम्यान रात्री ९ च्या सुमारास अवकाळी पावसात अचानक त्यांच्या वाडग्यावर वीज कोसळल्याने ११ लहान मोठ्या मेंढ्या व २ शेळ्यांसह १ लहान पाठ अशा १४ शेळ्या-मेंढ्या जागीच मृत्यू पावल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती पोलीस पाटील हरिदास बेहेरे पाटील यांनी तहसीलदार अभिजीत पाटील यांना दिली . तलाठी विकास माळी यांनी घटनास्थळी भेट देवून मृत शेंळ्या मेंढ्याचा पंचनामा केला.

या घटनेत मेंढपाळ शेतकरी शिवाजी गडदे यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी मृत शेळ्या-मेंढ्याचे शवविच्छेदन केले. यावेळी परिचर दयानंद केंगार उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अवकाळी पावसात विज पडून आजी नातीचा मृत्यु

’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.