Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

70 रुग्ण दारूच्या व्यसनामुळे त्रस्त, तालुका क्लिनिकतून घेतला उपचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि. 28 एप्रिल : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येत आहे.

सदर शिबीरामध्ये 10 वी व 12 वी नंतर काय? भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगार, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्था यांचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शकांकडू मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालक यांनी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीरामध्ये सहभागी होवून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंतप्रधानांच्या हस्ते अहेरी आणि सिरोंचा येथील एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन

कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.