Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ढेकणी वासियांनी उभारला दारूबंदीचा विजयस्तंभ

- दारूविक्रीमुक्त गावाची मिळवली ओळख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली, दि . २८ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील ढेकणी गावाला दारूमुक्त करण्यात ग्रामस्थ, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. आता जवळपास वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही दारूबंदी कायम आहे. या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी विजयस्तंभ उभारला.
ढेकणी हे गाव गेल्या एक वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव आहे. या गावातुन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना वारंवार नोटीस देणे, दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भातील हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच कायम दारूमुक्त गाव राहावे, शांतता टिकून राहावी, यासाठी ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा ठराव घेऊन जो कोणी दारू विक्री करणार त्याला ५ हजार रुपये व एक बोकड अशा स्वरूपातील दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विविध उपायोजना करून गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात आली. या गावाने नुकतेच विजयस्तंभ उभारला आहे.
या कार्यक्रमाला गाव पाटील दिवाकर नरोटे, सुखदेव कुमोटी, रवींद्र गावडे, अर्जुन मडावी, लक्ष्मण कोंदामी, भाष्कर कुमोटी, अजय कुमोटी, वनिता मठ्ठामी, निवृता कुमोटी, सुनीता कुमोटी, देवलाबाई गावडे, मानिबाई ताडामी, रुपाली मट्ठामी, सोनाली कोवासे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले.
हे देखील वाचा : 
https://loksparsh.com/maharashtra/70-patients-suffering-from-alcohol-addiction-got-treatment-from-taluka-clinic/37320/

Comments are closed.