Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधानांच्या हस्ते अहेरी आणि सिरोंचा येथील एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, ता.२८ एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा येथे नव्यानेच सुरु केलेल्या एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजप नेते बाबूराव कोहळे उपस्थित होते. सिरोंचा येथील कार्यक्रमाला खासदार नेते यांनी आभासी पद्धतीने हजेरी लावली. दोन्ही तालुके दुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्याने कनेक्टीव्हीटीचा अभाव होता. परंतु शंभर व्हॅटचे ट्रान्समीटर सुरु झाल्याने आता दोन्ही तालुक्यातील नागरिकांना सरकारच्या योजनांसह पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमांचाही रेडिओ आणि मोबाईलच्या माध्यमातून आस्वाद घेता येणार आहे. शिवाय शासकीय योजना आणि विविध घडामोडींची माहिती मिळण्यास मदत होईल, असे खासदार अशोक नेते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.