Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव पारित!

सरपंच करुणा उराडे यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित, पारित करण्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुल : बेंबाळ ही ११ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. भाजपाप्रणीत पॅनलचे ११ सदस्य निवडून आले तसेच सरपंच सुद्धा थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांचा बेंबाळ गाव असल्याने संपूर्ण ग्रामपंचायतीवर त्यांचे वर्चस्व होते.

साडेतीन वर्षापासून करुणा उराडे हे सरपंच या पदावर कार्यरत होती.  १८ जून २०२१ ला ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित केला तर १ सदस्य तटस्थ आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा करूणा उराडे उच्चशिक्षित असल्यामुळे हे अल्पावधीतच आपल्या कामामुळे लोकप्रिय झाल्या होत्या. त्या भाजपाप्रणित उमेदवार होत्या परंतु गावातल्या सर्व नागरिकांचे कामे कोणताही भेदभाव न करता विकास कामाला चालना गती देत होत्या. उच्चशिक्षित व तरुण उमेदवार असल्याने गावातील जनतेनेही त्यांना निवडून दिले होते.

संपूर्ण गावातील नागरिक त्यांच्या कामावर समाधानी असतांना गावातील काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व मनमानी कारभारामुळे त्यांना काम करण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. तरीही त्या न डगमगता आपल्या विकास कामांचा धडाका सुरु ठेवला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा फायदा गरिबांना व्हावा याकरिता त्या नेहमी कसोशीने प्रयत्न करीत असायचे. त्यामुळे गावातील जनता ही त्यांच्या कामावर खुश होती.

परंतु ग्रामपंचायतीला मिळणारा निधी व कामे होत असल्याने राजकीय हस्तक्षेपापोटी सरपंचावर व ग्रामसेवकावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला. या दबावतंत्राला न घाबरता करुणा उराडे यांनी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत होत्या.

सरपंच कोणालाही जुमानत नाही व कोणत्याही दबावाला घाबरत नाही हे बघून ग्रामपंचायत सदस्य व येथील राजकीय द्वेषातून त्यांना पायउतार करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. संपूर्ण पॅनल भाजपाप्रणीत असल्यामुळे दबाव तंत्राचा वापर करून सर्व सदस्यांना हाताशी घेऊन एका कर्तव्यशील व प्रामाणिक सरपंचावर अविश्वास ठराव पारित केला. त्यामुळे गावातील नागरिक सरपंच पायउतार झाल्याने नाराजी व्यक्त करित आहेत.

राजकीय व्यवस्था व भ्रष्टाचारी मानसिकता यामुळेच एका कर्तुत्ववान प्रामाणिक सरपंचाचा बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.

हे देखील वाचा :

तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र

दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.