Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

हिमायतनगर तालुक्यातील विरसणी रस्त्यावरील ही घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड :  गोंडस मुलीला जन्म देऊन अवघे चारच दिवस झाले आणि माताच त्या चिमुकलीची वैरीण झाली. आणि रस्त्याच्या कडेला बेवारसरित्या कॅरीबॅगमध्ये सोडून पलायन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील घारपूर ते विरसणी रस्त्यावरील ही घटना असून काल दिनांक १८ जून २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार दुचाकीवरून कामानिमित्त जात असतांना एका नाल्याच्या शेजारी एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला असता रामदीनवार यांनी जवळ जाऊन पाहिले तर एका कॅरीबॅग मध्ये एका चार दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रामदीनवार यांनी क्षणाचाही कुठलाही विचार न करता सरळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्या चिमुकलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चिमुकलीची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, चिमुकलीला बेवारसरित्या सोडून जाणाऱ्या त्या मातेचा हिमायतनगर पोलिस शोध घेत आहेत. सामाजिक कार्यकर्ते रामदीनवार यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतूक होत असून त्या मातेलाही कठोर शिक्षा व्हावी याचीही मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक! रिक्षाचालक महिलेने प्रियकराच्या मदतीने केली नवऱ्याची हत्या!!

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

महिला रुग्णालयातील बालरुग्णांच्या वॉर्डच्या भिंती झाल्या विविध रंगात रंगून झाल्या बोलक्या!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.