Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदित्य ठाकरे यांनी केलं इन्फिनिटी स्कल्पचर सुशोभीकरण आणि नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन..

आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणि ते राजकारणात - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी केली गांधी मार्केट, हिंदमाता, कोस्टल रोडच्या कामांची केली पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05,ऑगस्ट 22 :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी गांधी मार्केट तसंच हिंदमाता येथील अंडरग्राऊंड वॉटर टॅंक कामांची पाहणी केली. यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील आदित्य ठाकरे यांनी दिल्या. दरम्यान, माध्यमांशी बोलताना विरोधक करत असलेल्या टिकेवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना आम्ही जनतेच्या कामात व्यस्त आहोत आणीबते राजकारणात व्यस्त आहेत अशी सडेतोड उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी इन्फिनिटी स्कल्पचर सुशोभीकरण आणि नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. हाजीअली येथे टनेलमध्ये जाऊन कशा पद्धतीने काम सुरू आहे याची पाहणी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, गांधी मार्केटला गेलो, अनेक वर्षे हिंदमाता येथे मीडिया यायचा, आम्ही यायचो, कधी कधी छातीपर्यंत पाणी भरलेलं असायचं, गुडघ्यापर्यंत पाणी असायचं. तेव्हा प्रश्न विचारला जायचा की हे किती दिवस चालणार. सतत कारणं देऊन चालणार नाही, यावर तोडगा काढणं महत्वाचं होतं. त्यावेळी गांधी मार्केटच्या इथे पंप लावले आहेत. हिंदमाता येथे सेंट झेविअर्सचं मैदान होतं तिथे दोन मोठे अंडर होल्डिंग टॅन्कस केले. प्रत्येक महिन्यात येऊन याचा पाठपुरावा केलेला आहे. यावेळी येण्याची गरज भासली नाही कारण पाणी तुंबलं नाही याचा आनंद आहे. हे माझं स्वतःचं श्रेय सांगणार नाही. आयडिया वगरे काहीना काही करत असतो. आमच्या स्थानिक नगरसेविका उर्मिला ताई, श्रद्धा ताई असतील यांनी देखील पाठपुरावा केला. पालिकेच्या इंजिनिअर्स ने देखील जोर लावून काम केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, टनेल आहे, ज्या मशीनचं नाव मी ठेवलं होतं मावळा म्हणून; जोरात काम सुरू आहे, वेळेपेक्षा आधी काम होईल अशी अपेक्षा आहे. कोस्टल रोडच्या कामाची पाहणी सतत करत आलोय. आता थोडी सर्कस सुरू आहे त्यांची त्यामुळे करता आलं नाही. पण आमचं लक्ष्य मुंबई आणि मुंबईकरांच्या सुख सोयींवर आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आरे बाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. 806 एकर जंगल म्हणून आरेची जागा घोषित केलं होतं. केवळ झाडांचा विषय नाही आहे. तिथे 5-6 वाघ आहेत, कांजूर मार्गला आम्ही सगळे डेपो हलवले होते. 8 ते 9 हजार कोटी वाचवले असते. चारही लाईनचं एकाच ठिकाणी काम झालं तर जमिनीची किंमत कमी होईल, जनतेचे पैसे वाचवू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. तीन पक्ष बदलून झालेले आणि चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा याचा आपण विचार करायला हवा. गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न करताहेत. यांनी एवढी कारणं दिली आहेत ना. शिव संवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यत यांचं कारण बदललेले असतं. कोणाला ही गद्दारी पटलेली नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा. सर्कस मध्ये काय बोलायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. लोकांचा विश्वास चांगल्या माणसावर आहे, उद्धव साहेबांवर आहे. आम्ही प्रेम आणि विश्वास यांच्यावर ठेवला तो यांनी मोडला याचं दुःख आम्हाला झालं आहे. गोलपोस्ट बदलत राहतील आणि त्यांच्या गोलपोस्टवर आम्ही गोल मारणं हे योग्य वाटत नाही. आतापर्यंत जी कारणं दिलीत त्याचा आढावा घ्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.यावेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चेवर भाष्य करत चर्चा फेटाळून लावली. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो ठरवेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाच नंबर वन..

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.