Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा खोडा…

शिंदे गटात धुसफूस

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 02 सप्टेंबर :- प्रत्येक आमदाराला वाटते की मला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, आणि ते स्वाभाविक आहे. परंतु एकाच वेळी सर्वानाच खुश करता येणे अश्यक्य आहे. आणि हीच गोष्ट मंत्रिमंडळ विस्तारासाठी अडचणीची ठरत आहे. शिंदे आपल्या नाराजाना समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींना महामंडळ, किंवा राज्यमंत्री दर्जा असलेली एखादी कमिटी देण्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांना देण्यात आले आहे. मात्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे , कारण भाजपचे १०५ आमदार आहेत. आणि मंत्रिमंडळ विस्तारात त्याच प्रमाणात स्थान मिळावे अशी भाजप आमदारांची मनिषा आहे.

दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिला खरा; पण दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजी उघडपणे दिसण्याची भीती आहे. भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याकडे शिंदे गटाचे आमदार बोट दाखवत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने अपक्षांसह बंडखोरांत धुसफूस असल्याचे दिसून आले. भाजपमध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. या विस्तारानंतर नाराजांची समजूत काढताना १५ सप्टेंबरपर्यंत विस्तार करण्याचे सूतोवाच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी केले होते. आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी असल्याचे बोलले जात असले, तरी भाजपकडून मात्र, अद्याप होकार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वरळी कुणाची ?

NCRB चा धक्कादायक रिपोर्ट !

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.