Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

NCRB चा धक्कादायक रिपोर्ट !

विध्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 1 सप्टेंबर :- विविध कारणांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये परिक्षातील अपयश, पालकांच्या मुलांविषयी असणाऱ्या राक्षसी महत्वाकांक्षा,बेकारी, प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळे विध्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, आणि ही गंभीर बाब आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला विद्यार्थिनींच्या आत्महत्येचे प्रमाण मागील पाच वर्षांची आकडेवारी ही ४३.४९ टक्के होती तर पुरुष विध्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण ५६.५१ टक्के इतके होते. २०१७ साली ४ हजार ७११ विध्यार्थ्यांनीनी आत्महत्या केली होती तीच संख्या २०२१ साली ५ हजार ६९३ एवढी होती.तसेच एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी फक्त ४.६ टक्के पदवीधर किंवा अधिक शिक्षित होते. चिंताजनक बाब अशी की १८ वर्षांखालील १० हजार ७३२ तरुणांनी जीव गमावला आहे. कौटुंबिक समस्या हे देखील एक कारण आहे. १८ वर्षांखालील विध्यार्थ्यांची २०१७ साली ३२.१५ टक्के वाढ झाली असून २०१७ मध्ये यात वाढ होऊन ही संख्या ९ हजार ९०५ इतकी झाली आहे.

तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांचा सर्वंकष विचार करण्याची गरज असून वयात येणाऱ्या विध्यार्थी आणि विध्यार्थ्यांनीचे आणि पालकांचे योग्य ते समुपदेशन करणे ही काळाची गरज आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

एलपीजी गॅस दरात घसरण.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन

Comments are closed.