Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन

एटापल्लीतील धक्कादायक घटना ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 01 सप्टेंबर :-  दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवघेण्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये एकप्रकारचे नैराश्य येत आहे. आणि या नैराश्यातून काही तरुण आत्महत्येसारखा असुरी मार्ग स्वीकारत आहे. अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली आहे.वैद्यकीय शिक्षण परीक्षेत (नीट) अपयश येईल या भीतीपोटी हर्षद सदू तलांडे(१८) या विध्यार्थ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने बारावी उत्तीर्ण झाल्यावर २०२१ ला वैधकिय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. आता त्याचा नीट परीक्षा देण्याचा दुसरा प्रयत्न होता.

यावर्षी जुलै मध्ये नीट परीक्षा दुसऱ्यांना दिल्यावर १९ ऑगस्टला तो नागपूरहून घरी परतला. आपल्याला कमी गुण मिळतील या तणावयुक्त भीतीच्या वातावरणात असतांना त्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले.
ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले. पण प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथे हलविण्यात आले.पण उपचारा दरम्यान बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हर्षदचे दुःखद निधन झाले. मृत विध्यार्थ्यांचे वडील शिक्षक असून आई ग्रामपंचायत सदस्य आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेकडे पाहिल्यावर समाजमनावर याचे काय पडसाद उमटतील याची कल्पना येते. आजकाल पालकांचा आपल्या पाल्याने अमुकच एक गोष्ट केली पाहिजे असा एक प्रकारचा दबाव येतो, आपल्या मुलांची आवड, त्यांना एखाद्या विषयात असणारी रुची याकडे पालक दुर्लक्ष करतात, आणि पालकांना जे हवे असते ते मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलांवर मानसिक ताण येतो, आणि मग नैराश्यातून आत्महत्या सारखे प्रसंग घडतात. याकरिता पालकांनी सुद्धा मुलांच्या कलाने विचार करून त्यांना शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय याबाबत सकारात्मकता दाखवणे आजच्या घडीला गरजेचे आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई; अध्यादेश जारी…

Comments are closed.