Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संविधान दिन साजरा आणि शहिदाना श्रद्धांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, 26 नोव्हेंबर :- पोलीस अधिक्षक कार्यालयात 26/11 हल्यातील शहींदान श्रध्दांजली व संविधान दिन · निमित्ताने संविधान उदेशिकेचे सामुहीक वाचन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. नांदेड पोलीस दलातर्फे 26 / 11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच नांदेड पोलीस दलातर्फे आज दिनांक 26.11.2022 रोजी 11.00 वा. पोलीस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली. सचिन सांगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, देगलूर यांनी संविधान उदेशिकेचे सामुहीक वाचन केले.

नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार महिला पुरुषांनी आपले रक्तादन केले. या प्रसंगी. डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय नांदेड, विजय डोंगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी किनवट, सिध्देश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, विक्रांत गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद, व्दारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, श्री लक्ष्मण राख, पोनि नियंत्रण कक्ष, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, उत्तम वाघमारे, पोउपनि आणि पोलीस अधिक्षक कार्यालय येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार, तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्यने हजर होते. सुर्यभान कागणे, सपोउपनि, संजय सांगवीकर,पोना, विनोद भंडारे, पोकॉ यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.