Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई, 26 नोव्हेंबर :- भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन देशभर साजरा केला जातो.याच दिनाचे औचित्य साधून आज बेलापूर येथील कोकण भवनात मुंबई समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनीषा देवगुणे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), माधुरी डोंगरे, प्रभारी तहसीलदार, सामान्य प्रशासन, सोनावणे, सहाय्यक संचालक, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, धर्मराज गोसावी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, संजय भोसले, जनसंपर्क अधिकारी, विनोद जामनेकर, बाईत इत्यादी उपस्थित होते.

शासनाच्या वतीने भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य यावर लक्ष केंद्रित करून 26 नोव्हेंबर रोजी जागरूकता मोहीम राबविली जाते. या मोहिमे अंतर्गत संविधान दिनी प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज सकाळी 11 वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकेचे वाचन वंदना कोचुरे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी कोकण भवन येथील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधीत समतापर्व हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. संविधान दिनानिमित्त प्रभातफेरी, संविधान वाचन, व्याख्याने, जाती प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, जेष्ठ नागरिक, तृतीय पंथी इत्यादी साठी विविध कार्यक्रम, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी वंदना कोचुरे यांनी दिली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Comments are closed.