Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई दि ,२६ नोव्हेम्बर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली  . त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. मात्र, आज सकाळी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज दुपारी 2.30 वाजता विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा दबदबा होता. गेल्या काही दिवसांपूर्वी घशाच्या त्रासामुळे नाटकापासून ब्रेक घेतला. त्यांनी आजवर त्यांच्या नावाप्रमाणेच अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

 

 

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे संविधान दिन साजरा.

Comments are closed.