Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे संविधान दिन साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 26 नोव्हेंबर :- भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन भिवंडी महानगरपालिके तर्फे साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे आवारात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाच्या नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रह असताना कर्तव्यपालनाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९. भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माननीय प्रशासकता तथा आयुक्त यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत परिशिष्ट एक भारताचे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास निकम, एल पी गायकवाड, सहाय्यक आयुक्त नितीन पाटील, सर्व प्रभाग अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे- नीलम गोरे

Comments are closed.