Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत युवाशक्ती गणेश मंडळातर्फे स्वच्छता अभियान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 22 सप्टेंबर : “गाव स्वच्छ तर देश स्वच्छ” या स्वच्छ भारत अभियानातील विचारांना प्रोत्साहित होऊन स्थानिक पावर हाऊस कॉलनी जवळील हाकी ग्राउंड लगतच्या युवाशक्ती गणेश मंडळाने शहरात स्वच्छता अभियान सल्लागार संदीप कोरेत व नगरसेवक तथा मंडळाचे अध्यक्ष विकास उईके यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकरंगी टी-शर्ट,हातमोझे घालून शहरातील दानशूर चौक, एसबीआय बँक चौक, गांधी चौक, पोलीस स्टेशन चौक, मज्ज्जिद चौक व आजाद चौकात स्वच्छता अभियाना अंतर्गत सागर सडमेक व प्रणित सडमेक यांच्या उपस्थितीत हातात झाडू घेऊन स्वच्छता केली व त्याची विल्हेवाट लावली.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष मयूर पिपरे, दुष्यंत आदे, अमोल गाऊत्रे, अजय गुरनुले सहभागी होते. सोबतच सदस्यगण कार्तिक कोरेत ,सुधीर कोरेत,कुणाल गाऊत्रे, आकाश पुपलवार ,कार्तिक आदे ,शेखर आदे, विक्रम तुंबडे,ओमकार गुरूनुले,नवीन येलाम,स्वरूप नागोसे,प्रतीक गुरूनुले, शांतनु नैताम, शुभम कावळे,सुरज येनगंटीवार,सुमित कावळे ,अरुण आदे, आशिष गाऊत्रे,राजु गाऊत्रे, धर्मराज कोडपे, सुरज गुरनुले, हर्ष कावळे स्वच्छता अभियानात सहभागी होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.