Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परवानगीयुक्त 44 सार्वजनिक गणेश मंडळाची अहेरित प्रतिष्ठापना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 अहेरी, 22 सप्टेंबर : राज्यात प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाला ओळखले जाते. दरवर्षी दहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक सणाला अहेरी परिसरातून सुद्धा मागील वर्षीच्या 26 ऐवजी यावेळी 44 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सव विविध सामाजिक समस्यांना देखाव्यातून साजरा करण्याचे ठरविले आहे.
स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये 44 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत. बहुतांशी स्थानिक व काही वार्डातील मंडळींनी सुद्धा गणेश मूर्ती बसवून विसर्जन केले.
स्थानिक “दानशूरचा राजा”गणेश मंडळा अंतर्गत विविध साहित्याचे वाटप गरजूंना दरवषी करण्यात येते. युवाशक्ती गणेश मंडळाने चांद्रयान व इस्त्रोतील यानाची प्रतिकृती साकारून सामाजिक समस्या व स्पर्धा घेण्याचे निश्चित केले.

“अहेरीचा राजा” म्हणून परिचित असलेले माजी पालकमंत्री राजे अमरीशराव यांच्याद्वारे स्थापित राजमहालाच्या पटांगणातील प्रसिद्ध आकर्षक गणेश मूर्ती, देखावा व रोषणाई आकर्षक आहे. यावेळी विविध स्पर्धांच्या आयोजनात एकल व समूह नृत्य, गायन, भजन व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन केले आहे.आजाद चौक गणेश मंडळ सुद्धा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.
आहेरी परिसरातील अनेक भाविक तथा गणेश मंडळांना मात्र सार्वजनिक उपक्रम राबविताना रस्त्यावरील खड्ड्यांचा व नैसर्गिक पावसाचा व्यत्यय होत असल्याचे दिसते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.