Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मान्सून पूर्व शोध व बचाव पथकामार्फत रंगीत तालीम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि.18 जून : मान्सून तयारी 2021 च्या अनुषंगाने शोध व बचाव पथकास एक दिवसीय प्रशिक्षण तसेच शोध बचाव साहित्य हाताळणी कार्यशाळा SDRF चमुच्या माध्यमातून अरसोडा घाट, ता.आरमोरी व विर्शी घाट, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली येथे दि. 17.06.2021 घेण्यात आले. सन 2020 च्या महापूरात फटका बसलेल्या गावांपैकी सदर गावांची रंगीत तालीम करिता निवड करण्यात आली.

सदर प्रात्याक्षिकांमध्ये 5 मिनिटांच्या आत रबर बोट असेंम्ब्लड करणे, दोरीच्या सहाय्याने वाचविणे, नदीमध्ये योग्यरित्या बोट चालविणे, बोट बंद पडल्यास योग्‌यरित्या बाहेर येणे, बोट पलटल्यास बोट पुन्हा सरळ करणे, थर्माकॉल/पाण्याच्या प्लास्टीक बॉटल इत्यादीद्वारे लाईफ जॅकेट सारखे एखाद्याचे जीव वाचविण्याचे कौशल्याबाबत एसडीआरएफ, नागपूर यांच्या चमुने मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर प्रशिक्षणास सुरेश कराळे, पोलीस उपअधिक्षक, एसडीआरएफ, नागपूर, कृष्णा रेड्डी, डीडीएमओ, कल्याणकुमार डहाट, तहसिलदार आरमोरी, संतोष महाले तहसिलदार देसाईगंज, सोमनाथ माळी तहसिलदार कुरखेडा, दिगांबर सूर्यवंशी पोनिरीक्षक आरमोरी, चेतन हिवंज, बीडीओ आरमोरी, डॉ. भूषण रामटेके मुख्याधिकारी न.प. देसाईगंज, श्रीमती माधुरी सलामे मुख्याधिकारी न.प. आरमोरी, गावडे सपोनिरीक्षक वडसा, डॉ. अभिजित मारभते, योगेंद्र चापले नायब तहसिलदार, राम नैताम नायब तहसिलदार, अजय कालसर्पे, पोउनि एसडीआरएफ व एसडीआरएफ नागपूर यांची चमू, स्थानिक महसूल, पोलीस, नगरपालिका, पंचायत, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन गडचिरोली

अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा

उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.