Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन गडचिरोली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.18 जून : सध्या गडचिरोली जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली असून गडचिरोली जिल्हा सध्या लेवल-3 मध्ये समाविष्ट आहे. कोविड-19 साथरोगाची परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात अद्याप आलेली नाही तसेच भविष्यात कोविड साथरोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा सध्या नागरिक कोविड-19 साथरोगासंदर्भात सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे इ. आवश्यक बाबी करत असल्याचे दिसून येत नाही आहेत ज्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे भविष्यात पुन्हा कडक निर्बंध/टाळेबंदी/लॉकडाऊन लावण्याची गरज भासू शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तेव्हा सर्व नागरिकांना, दुकानदारांना आवाहन करण्यात येते की, कोविड-19 साथरोगसंदर्भाने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नियमितपणे मास्क वापरावे. जे नागरिक/दुकानदार कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचा पालन करत नाहीत, मास्कचे वापर करत नाही अशा नागरिकांना/दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल व दंड वसूल करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आजही मृत्यूची नोंद नाही, 57 कोरोनामुक्त तर 35 नवीन कोरोना बाधित

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

Comments are closed.