Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा

नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन सादर.

  • उपोषणाला बसण्याचा विद्यार्थ्यांकडून इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी :- येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी पदभरती घेण्याचे राज्य सरकार तर्फे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे घरी बसल्या बसल्या अभ्यास होत नसल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर पंचायत अहेरीकडून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका बंद करण्यात आली होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “ब्रेक द चेन” च्या नावाने नवीन नियमावली काढली आहे. त्याच अनुषंगाने नियमाचे पालन करून अहेरी येथील अभ्यासिकेत बसून अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी अभ्यासिका सुरू करण्यात यावे म्हणून मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन देण्यात आले.

येत्या काही दिवसांत अभ्यासिका सुरू न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक सूनतकर, सागर गावतुरे, विशाल रामटेके, अभिषेक बोंमनवार, सचिन दहागावकर, राजकिरण गुरनुले, अनिकेत दुर्गे, सुनील पिपरे, धीरज गोटा, राजू लेखामी, मनीष कूसराम, सूरज साखरे, अंकित नूल्लुरवार शुभम नीलम आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

 

Comments are closed.