Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान भरडाई 10 जूनपूर्वी पुर्ण करा : प्रधान सचिव, विलास पाटील

मिलकडून भरडाई पुर्ण न झाल्यास पुढील हंगामात काम नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 27 मे : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित 11.50 लक्ष क्विंटल धान भरडाई 10 जून पुर्वी करण्याचे निर्देश राईलस मिल मालकांना आज गडचिरोली येथे दिले. ते गडचिरोलीमध्ये उर्वरित धान भरडाई समस्या व इतर प्रश्नांवर आढावा घेण्यासाठी आले होते.

बैठकीत सर्व राईस मील धारकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले जर दिलेल्या वेळेत धान भरडाई झाली नाही तर त्यांचे पुढील हंगामातील धान भरडाईचे काम रद्द करण्यात येईल व संबंधित मीलवर ढिबार करण्याची कारवाई प्रस्तावित केली जाईल. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील उघडयावरील धान लवकर भरडाई होणार असून पुढील हंगामातील धान साठवणूकीसाठी जागाही उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील धान खरेदी व भरडाई बाबत माहिती दिली. या बैठकीला मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर, टीडीसीचे महाव्यवस्थापक जयराम राठोड, पुरवठा शाखा नागपूर विभागाचे उपायुक्त रमेश आळे, गडचिरोली पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे व चंद्रपूरचे पुरवठा अधिकारी तसेच जिल्ह्यातील राईस मिल मालक उपस्थित होते.

या बैठकीत प्रधान सचिव विलास पाटील यांनी धान भरडाईबाबत मिल मालकांच्या मागण्या काही अंशी मान्य केल्या व उर्वरीत धान भरडाई 10 जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच सदर भरडाई जलद गतीने करत असताना दुर्गम भागातील उचल अगोदर करावी असेही निर्देश दिले. रब्बी हंगामातील धान ठेवण्यासाठी आवश्यक्तेनुसार गोदामे भाडयाने घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिल्या सूचना

जिल्ह्यातील मका खरेदीबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिवांशी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील मका खरेदी करणेसाठी लवकर निर्णय घेणेबाबत निर्देश दिले. तसेच त्यांनी जिल्ह्यातील उर्वरीत धान भरडाई वेळेत केली तर पुढील हंगामातील धान साठवणूकीची प्रक्रिया सुलभ होईल असे सांगितले. धान साठवणूकीसाठी पुढिल काळात इतर इमारती ताब्यात घेण्याचाही विचार करावा अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दूरध्वनीद्वारे दिल्या.

हे देखील वाचा: 

वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर

कोरोनावरील “जितेंगे हम” लघुपट कोरोना जनजागृतीसाठी उपयोगी

 

Comments are closed.