Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसचा प्रस्तावित सुरजागड लोह प्रकल्पाला विरोध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उसेंडी यांचे प्रतिपादन,महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली २० ऑगस्ट :एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोह प्रकल्पासाठी लोह खनिज उत्खनन केल्याने मौल्यवान वनसंपदा व आदिवासी संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे त्यामुळे या प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध असल्याची  भावना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी  एटापल्ली येथे  मंगळवारी तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे.

सुरजागड लोहखनिज प्रकल्पात उत्खननामुळे जागतिक दर्जाची वनसंपदा आदिवासींचे निसर्ग दैवत व संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे . त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून या प्रकल्पाला विरोध केला जाणार असल्याचे डॉ. उसेंडी यांनी सांगितले नगरविकास विभागाच्या काही जाचक अटीमुळे नगरपंचायत क्षेत्रात घरकुल शौचालय शेती उपयोगी योजना आरोग्य व शिक्षण अशा लाभाच्या योजनांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रासाठी काही अटी व शर्ती शिथील करण्याची मागणी नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे काँग्रेस ने सुरजागड लोह प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी यांची सुरजागड लोहप्रकल्पाबाबत भूमिका अद्याप गुलदस्त्यात  असल्याने येत्या काळात सेना व रांकाँ सुरजागड बाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे .

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.