Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं

१४६ जणांना वाचवण्यात यश तर १७० बेपत्ता

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, १८ मे : तौक्ते चक्रीवादळाने  मुंबईला  झोडपून काढले आहे. मुंबईच्या समुद्री भागात १७५ किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं. भारतीय नौदलाने खवळलेल्या समुद्रातून १४६ लोकांना सुखरूप वाचवलं. पण अजूनही १७० पेक्षा जास्त लोकं अजून बेपत्ता आहे.

खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक जहाज अडकले आहे. या जहाजावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी INS कोलकाताला पाठवले आहे. या जहाजावर १३७ लोकं अडकलेली आहेत. त्यापैकी ३८ जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तोत्के’ चक्रिवादळ शमलं असलं तरी खोल समुद्रात मात्र अजूनही वातावरण प्रचंड प्रतिकूल आहे. समुद्राला जीवघेणं उधाण आलंय. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला गेल्या दोन दिवसात खोल समुद्रात अडकलेल्या जहाजांवरून चार SOS चे कॅाल आलेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं मोठं रेस्क्यू ऑपरेशन सध्या अरबी समुद्रात सुरू आहे. भारतीय नौदलाने मुंबईच्या नौदल एअर बेस INS शिक्रा येथून सी किंग हेलीकॅाप्टर बचाव कार्यासाठी पाठवलंय.

बार्ज P305 या प्रवासी जहाजावर २७३ प्रवासी आणि खलासी अडकलेत. त्यापैकी १४६ प्रवाश्यांना भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौकांनी वाचवून सुरक्षितपणे बाहेर काढलंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू

बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.