Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्तीसगडमधील CRPF जवान आणि आदिवासींमध्ये संघर्ष, 3 जणांचा मृत्यू

सिलेगरच्या कॅप उभारायला हजारो आदिवासी नागरिकांचा विरोध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बिजापूर, डेस्क 18 मे:- छत्तीसगडमधील बिजापुर जिल्ह्यात सिलेगर येथील पोलीस कॅप उभारणीला विरोध करत हजारो आदिवासी तिथे जमले होते त्यावेळी सीआरपीएफ कॅपवर माओवाद्यांचा गोळीबार केला प्रतिउत्तरात देताना  सीआरपीएफ ने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. पण मृतक नागरिक आहेत की माओवादी हे स्पष्ट नाही. तर या गोळीबारात 9 नागरिकांचा मृत्यू झाला असा दावा आदिवासींनी केला आहे.

शेकडो आदिवासी नागरिक हा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोमवारी शेकडो आदिवासी नागरिक सिलेगरच्या कॅपजवळ जमा झाले होते. या ठिकाणी कॅप उभारायला आदिवासी नागरिकांचा विरोध आहे. गेल्या दोन दिवसापासून नागरिक विरोध करीत आहेत. रविवारी प्रशासनाने त्यांची समजुत काढुन परत पाठवले होते. पण ते सोमवारी शेकडो नागरिकां सह दुपारी कॅपच्या जवळ गोळा होऊन नारेबाजी करु लागले. या नागरिकामध्ये लपलेल्या माओवाद्यानी कॅपवर गोळीबार केल्याचा पोलीस दावा करता येत दुसरीकडे मृतक कोण आहे हे अद्यापी स्पष्ट नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

झालेल्या गोळीबारात पंधरा ते वीस नागरिक जखमी झाले आहे. तर 9 नागरिक गोळीबारात ठार झाल्याचा दावा आदिवासी नागरीकांनी केला आहे. या भागात तणावाची परिस्थिती असून जखमी नागरिकांना बिजापुरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Comments are closed.