Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राउतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी

दिवाळी तुरूंगातच

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  21 ऑक्टोबर :- शिवसेना खासदार संजय राउत यांच्या जामीन अर्जावर आता थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे. राउतांचा कारागृहातीलन मुक्काम 13 दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, राउतांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संजय राउतांना कथित पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडी ने अटक केली होती.

पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राउत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडी ने अटक केली होती. त्यानंतर राउतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राउत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडी ने संजय राउत यांचा पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाउ प्रविण राउत पत्रा चाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुप कडून 112 कोटी रूपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रूपये संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राउत परिवाराला पत्रा चाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरूवातीला समोर आले होते आणि ज्यांच्या वर कारवाई झाली होती ते प्रविण राउत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राउत असल्याचा दावा ईडी ने केला. संजय राउत हेच प्रविण राउत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते होत असे ईडीने म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ईडीचा दावा काय?

दरम्यान ईडीने केलेल्या दाव्यानूसार जीपीसीएल ने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राउत यांना एचडीआयएल कडून 100 कोटी रूपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाउंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राउत यांच्या जवळचे कुटूंबिय सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राउत यांच्या कुटूंबाचाही समावेश आहे असे ईडीने सांगितले. 2010 साली संजय राउत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राउत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रूपये जमा केले होत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नेमकं काय आहे पत्रा चाळ घोटाळा प्रकरण

शिवसेना खासदार संजय राउत पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भुखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रविण राउत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे. प्रविण राउत यांच्यावर पत्रा चाळमध्ये राहणार्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रविण राउत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. त्यानंतर 2011, 2021 आणि 2013 मध्ये भुखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले होते.

हे पण वाचा :-

T20 World Cup 2022 : Ind Vs Pak भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरूंगातच, जामीन अर्ज फेटाळला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.