Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेडिगड्डा प्रकल्पाने प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या:माजी आ.दीपक आत्राम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 21 ऑक्टोबर :-  गोदावरी नदीवर बनलेल्या मेडिगड्डा या तेलंगणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक एकरावरील शेती पाण्याखाली जात आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आ.दीपक आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅकवॉटर मुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक एकर उपजाऊ शेतजमीन पाण्याखाली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे कठीण झाले आहे. सोबतच या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोमनपल्ली या गावातील रहिवाशांना गावात पुराचे पाणी घुसल्याने चक्क रोडवर आपले बिऱ्हाड घेऊन गुजराण करावी लागत आहे. मेडीगड्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका सोमनपल्ली व या परिसरातील नागरिकांना बसतो आहे त्यामुळे त्वरीत सोमनपल्ली गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. येथील विद्यार्थ्यांची शाळा बुडाली त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सोय करन्याची मागणीही माजी आ.आत्राम यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पीक नष्ट झाले आहे त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतीचें त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आ.दीपक आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या भेटीतून केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.