Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना धान-बियाणांचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : आज दि 18 जून 2021 रोजी पोलिस प्रशासन गडचिरोली व उप पोलिस स्टेशन  रेपनपल्ली येथे यांचे संयुक्त विद्यमाने उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली येथे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या धान बियानाचे वाटप करण्यात आले.

कृषी विभाग, प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांचे सहकार्याने 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना धान बियाणांचे वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये श्रीराम ,HMT, 1010 या वाणाच्या बियानाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास CRPF 9 बटालियन F कंपनी चे असिस्टंट कमांडन्ट गौतम सरकार, उप पो स्टेशन रेपणपल्ली चे प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे, पो उपनिरीक्षक पांडुरंग हाके पो स्टेशन येथील अंमलदार उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमास उप पोलिस स्टेशन  रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापूर, चल्लेवाडा, कोडसेलगुडम, ताटीगुडम, लिंगमपल्ली, रेपनपल्ली या गावांतील नागरिक उपस्थित राहून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

तसेच नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्याबाबत अवाहन करण्यात आले.

हे देखील वाचा  :

गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन

 

 

Comments are closed.