Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंढकी येथील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी पंचायत समिती गणामध्ये मौजा एकारा येथे विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्यूत प्रवाह होणाऱ्या तारेचा (करंट) स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास समोर आली आहे.

मृतकाचे नाव हरी गोविंदा मुरखे (४८) आहे. आपल्या गावालगत असलेल्या शेतामधे धान पीकाला रासायनिक खत टाकण्याकरिता गेला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सविस्तर वृत्त असे की, कृषि पंपाला विज पूरवठा करण्यात येणारे दोन खांब मागिल ७ ते ८  दिवसापासून कोसळले होते. त्या खांबाचे विज पूरवठा खंडित करण्यात आलेले नव्हते. कोसळलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत तारातून सुरूच होते. मृतक शेतकरी शेतामधे धान पीकाला रासायनिक खत टाकण्याकरिता गेला होता. पडलेल्या वीज खांबाच्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू असावा याची त्याला जाणीव नव्हती. त्यातच वीज प्रवाह असलेल्या विद्युत तारेचा त्याचा पायाला स्पर्श होऊन विजेचा जोरदार शॉक त्याला लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेचा अधिक तपास पोलीस विभागाचे कर्मचारी करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

१४ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झाले एकूण महत्वाचे ३ निर्णय

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार: दि.१६ जुलैपासून आरक्षण सुरु

अखेर शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात नेलेल्या धानाची खरेदी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.