Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक मधल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या दरडी कोसळल्याने गंगाद्वार मंदिर परिसरात दगडांचा खच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक :  जिल्ह्यातील गंगा गोदावरी नदीचा उगमस्थान असलेल्या त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर दरडी कोसळण्याचा प्रकार सुरू झालाय. ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर गोदावरी उगम स्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड दिसून आले. दगड विविध भागात विखुरले असल्याने गंगा गोदावरी च्या मंदिराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे या मंदिराचा पुजारी आला असता त्याच्या लक्षात हा सर्व प्रकार आला आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होणारे उत्खनन आणि ब्रम्हगिरी पर्वतावर होणारे बांधकाम यामुळे या पर्वताच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसराची हानी होत असून जैवविविधता संवेदनशील क्षेत्र म्हणून याची घोषणा आता करण्याची गरज आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी जाणे जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्ध्या महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या गंगा गोदावरी नदीचे खोरे या ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या या तालुक्यामध्ये पाणी वाहून परिसरातील धरणांमध्ये पोहोचते सर्वात मोठ्या गंगापूर धरणातून गोदावरी चा प्रवाह प्रवाहित होतो हळूहळू या गोदावरीचा विस्तार नाशिक, नगर आणि मराठवाड्यात पर्यंत पोहोचतो. जायकवाडीतून नदीचे पात्र विस्तीर्ण होते आंध्रप्रदेशात जाते मात्र दोन राज्यांची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरीचा उगमस्थान आला भू माफियाचे ग्रहण लागले आहे.

ब्रह्मगिरीच्या परिसरात खोदकाम करून मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत तर अनेक जण रिसॉर्ट फार्महाउस बांधण्यासाठी ब्रह्मगिरीचे लचके तोडत असल्याची बाब दोन महिन्यांपूर्वी उघड झाली आहे. चहूबाजूला बांधकामाची आणि उत्खननाची स्पर्धा सुरू झाल्याने ब्रह्मगिरीचा पाया हळूहळू असुरक्षित होतोय विशेष म्हणजे महसूल प्रशासनाचा याला आशीर्वाद लाभतो आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

एकतर्फी प्रेमामधून ओबीसींनी बाहेर यावं! – ज्ञानेश वाकुडकर

 

Comments are closed.