Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जंगलातील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ मे: गडचिरोलीतील दिभना गावानजीकच्या जंगल परिसरात वंदना अरविंद जेंगठे (४०) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. हि घटना काल सायंकाळ च्या सुमारास घडली आहे.

वंदना अरविंद जेंगठे या आपली मुलगी व गावातील ४ महिलांसोबत कुड्याचे फुल तोडण्यासाठी जंगलात गेले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. परंतु हि बाब सोबतच्या महिलांच्या लक्षात आली नाही. किंचित ओरडण्याचा आवाज आला. शहानिशा केल्यानंतर वाघाने वंदना यांच्यावर हल्ला केल्याचे महिलांच्या लक्षात आले. परंतु भीतीमुळे सर्व महिला गावाकडे आल्या व सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता वंदना जेंगठे मृतावस्थेत आढळून आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

या घटनेमुळे दिभना परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. एकाच आठवड्यातील हि तिसरी घटना असून तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेक महिलांना प्राण गमवावे लागले आहे. वन विभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा. अशी मागणी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

25 वर्षीय युवकाचा प्राणहिता नदी पात्रात बुडून दुदैवी मृत्यू

वर्षभरातच! चिंचगुडी स्मशानभूमी बांधकामाचे पितळ उघड

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.