Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्षभरातच! चिंचगुडी स्मशानभूमी बांधकामाचे पितळ उघड

शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या निधीची वासलात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १८ मे: अहेरी सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत तालुक्यातील चिचंगुडी येथे वर्षभरापूर्वी स्मशानभुमी शेडसह इतर बांधकाम करण्यात आले. मात्र वर्षभरातच या बांधकामाचे पितळ उघडे पडल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयाची वासलात लावली गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा वार्षिक योजनेमार्फत आमदार निधी अंतर्गत अहेरीपासून जवळच असलेल्या चिचंगुडी येथे एक वर्षापूर्वी संबंधित कंत्राटदारामार्फत स्मशानभुमी शेडसह स्थानिक विकासात्मक कामे करण्यात आली.  यामध्ये स्मशानभूमी शेड, संरक्षण भिंत, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता, नदीकडे जाण्यासाठी पाय-या आदी कामे करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कामाकरीता जवळपास २ ते अडीच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र बांधकामाच्या वर्षभरातच या कामाच्या निकृष्टतेचे दर्शन घडण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला वर्षभरातच भेगा गेल्या असून काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केला गेल्याचे स्पष्ट होते. अहेरी सार्वजनीक बांधकाम विभागाअंतर्गत संबंधित कंत्राटदारामार्फत सदर विकासात्मक काम करण्यात आले. मात्र या निकृष्ट बांधकामाकडे संबंधित विभागानेही दुर्लक्ष केल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात आजी-माजी आमदारांसह अनेक मातब्बर मंडळी वास्तव्याने आहेत. या शहरापासून अवघ्या 3 किमी अंतरावरील चिंचगूडी या निकृष्ट बांधकाम झाले असतांना तालुक्यातील दुर्गम भागात झालेल्या विकासात्मक कामाची कल्पनाच न केलेली बरी.

शासनाकडून विकासात्मक बांबीसाठी कोट्यावधीचा निधी प्राप्त होत असल्याने या कामाकडे प्रशासनाद्वारे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील विकासाचा मेरू अल्पावधीचा ठरत आहे.

सखोल चौकशीअंती संबंधितावर कारवाई करा

चिंचगुडी स्मशानभूमी बांधकामाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करुन संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराचे देयके वितरण पूर्ण न झाले असल्यास ती देयके थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी.  संबंधित कंत्राटदार, एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.

संतोष ताटीकोंडावार – जिल्हाध्यक्ष, अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती

हे देखील वाचा :

डीआरडीओचे औषध ठरले लाभकारी, ऑक्सीजन सपोर्टच्या रूग्णांसाठी ‘संजीवनी’

बळजबरी करण्याऱ्या बापाचा मुलीनं केली हत्या

Comments are closed.