Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोदामाला आग लागून कोट्यावधीचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 28 ऑक्टोबर :-   गोदामाला आग लागून कोट्यावधीचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी कुर्ला परिसरात घडली आहे. मुंबई येथील कुर्ला परिसरात विविध साहित्य साठवून ठेवणारे गोदाम मोठ्या संख्येने आहेत. स्थानिक प्रसिध्द एलबीएस मार्गाला लागून असलेल्या गुलाब शहार इस्टेट मध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोदामाला आग लागली. चार तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी अग्निशमन दलाचे पंधरापेक्षा जास्त बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते.

या ठिकाणी कपडा, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य, भंगार साहित्य अशी गोदामे आहेत. यामुळे ही आग वाढत जात आहे. पुढील काही वेळ अजून या आगीवर नियंत्रण मिळविण्यास लागणार आहे. सुदैवाने यात कोणीतही जीवितहानी समोर आलेली नसली तरी आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.