Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 64 कोरोनामुक्त, तर 57 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 08 जून : आज जिल्हयात 57 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29721 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28577 वर पोहचली. तसेच सद्या 415 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 729 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नविन मृत्यू मध्ये 40 वर्षीय पुरुष सोमनपल्ली ता. सिरोंचा , 45 वर्षीय पुरुष वैरागड ता. आरमोरी , यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.40 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 57 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 10, अहेरी तालुक्यातील 04, आरमोरी 02, भामरागड तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 15, धानोरा तालुक्यातील 02, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 08, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 08 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 03 जणांचा समावेश आहे.

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 64 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 13, अहेरी 10, आरमोरी 00, भामरागड 01, चामोर्शी 14, धानोरा 03, एटापल्ली 05, मुलचेरा 04, सिरोंचा 03, कोरची 01, कुरखेडा 05 तसेच वडसा येथील 05 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.