Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोलीत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली द्वारा संचालित कृषी औद्योगिक खरेदी विक्री तथा प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित कुरखेडा च्या सहकार्याने गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान खरेदी केंद्राचे उदघाटन आज दि. १२ नोव्हेंबर रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक खेमनाथजी डोंगरवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, मुख्य प्रशासक प्रभाकरराव वासेकर, संघाचे उपाध्यक्ष तथा भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, उद्धवजी गहाणे, जीवन मेश्राम, आनंदराव जांभुळकर, व्यवस्थापक सुधाकर वैरागडे, लाकडे, व अन्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी सर्वप्रथम खा. अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजनाने फित कापून धान खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.