इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑफलाइन पद्धतीने उद्या सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत भरता येणार
गडचिरोली: दि. 29:- मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांनी, नामनिर्देशनपत्र दाखल करताना काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्याने सदरची बाब विचारात घेऊन इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासुन वंचित राहू नये आणि त्यांना निवडणुक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पद्धतीने (Offline Mode) स्विकारण्याचा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळदेखील दिनांक 30/12/2020 रोजी सायंकाळी 5.30 वा. पर्यंत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या सहा तालुक्यासाठी आयोगाने वाढवून दिलेला आहे.
तरी निवडणुक लढविणास इच्छुक उमेदवारांनी पारंपारिक पद्धतीने (Offline Mode) नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुचित करण्यात येत आहे.
Comments are closed.