Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावे – कमांडंट खोब्रागडे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी, दि. ७ जानेवारी : गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी समाजाचा मूकनायक बनण्याचे आवाहन ३७  बटालियन सीआरपीएफचे कमांडंट एम एच खोब्रागडे यांनी स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास प्रवृत्त करण्यास अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाला धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे , ३७ बटालियनचे कमांडट मनमदन कृष्णन, तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रूषी सुखदेवे, कमलापूरचे ज्येष्ठ सदस्य श्रीधर दुगिरालापाट्टी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पूर्वनियोजित अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव महाराज यांनीही समाज माध्यमाद्वारे पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमात धर्मराव कृषी विद्यालयाचे ग्रंथपाल हेमंतकुमार बोरकर यांनी पत्रकारितेवर उत्कृष्ट गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विज्ञान महाविद्यालयाची वर्ग बारावीची विद्यार्थ्यांनी कु. अलविना कुरेशी हिने उत्कृष्ट भाषणातून पत्रकारांच्या कार्याचा गौरव व्यक्त केला.

पत्रकार दिनाच्या यशस्वीते करिता उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सहसचिव मुकुंदा दुर्गे, सल्लागार सदाशिव माकडे, संघटक मुन्ना कांबळे, सहसंघटक साईनाथ चंदनखेडे, तसेच सदस्य ओमप्रकाश चुनारकर, प्रशांत ठेपाले, अनिल गुरनुले, उमेश पेंड्याला, संजय गजलवार, रोशन कम्बगोनीवार, दीपक चूनारकर यांनी सहकार्य केले.

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, संचालन संघटनेचे सचिव रमेश बामनकर तर आभार सदस्य बबलू सदमेक यांनी केले.

हे देखील वाचा: 

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा –  मंत्री चंद्रकांत पाटील

 

Comments are closed.