Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय उत्कर्ष २०२२-२३ मध्ये गोंडवाना विद्यापीठाला तृतीय क्रमांकाचे दोन पुरस्कार 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ६ जानेवारी : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष २०२२-२३ नुकतीच सोलापूर येथे दिनांक २ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत छायाचित्रण आणि उत्कर्ष कार्यप्रसिद्धी अहवाल यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या स्वंयसेवकांनी तृतीय क्रमांक पटकावत गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेलाय.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ .प्रशान्त बोकारे व रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा चे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की संघनायक यांच्या नेतृत्वात गोंडवाना विद्यापीठाचा संघ ९ मुले व ९ मुली असा एकूण १८ स्वयंसेवकांचा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला होता. या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेत संकल्पना नृत्य, पथनाट्य, समुहगीत, भारतीय लोक वाद्य, भारतीय लोककला-पोवाडा, भारूड, भजन, ललितकला-भीत्तीचित्र, साहित्य -निबंध, वकृत्वस्पर्धा, कविता, छायाचित्रण स्पर्धा, पथसंचलन, उत्कर्ष कार्यसिद्धी अहवाल स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या होत्या, या प्रत्येक स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे रासेयो स्वयंसेवक हिरिरीने सहभागी झालेत, पथसंचलन मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या संकल्पनेवर स्वयंसेवकानी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान ही संकल्पना घेऊन तुकाराम कोडापे यांनी ‘भगवान बिरसा मुंडा’ व सुरेंद्र ठाकरे यांनी क्रांतीवीर ‘बाबुराव शेडमाके’ यांची वेषभूषा साकारून आदिवासी नायकांच्या कार्याचा गौरव व संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला, सोबतच ‘वन्यजीव व आदिवासी’ यांच्यातील सोहार्दपूर्ण नाते दाखविण्यासाठी कालिदास मांदाडे यांनी वाघाची वेशभूषा साकारली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या विविध स्पर्धापैकी छायाचित्रण स्पर्धेमधे श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्वयंसेवक कु. राधिका दोरखंडे हिने तिसरा क्रमांक पटकविला. सोबतच उत्कर्ष कार्यप्रसिद्धी अहवाल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाला तिसरा क्रमांक मिळाला. रा से यो.संचालक डॉ. श्याम खंडारे व त्यांच्या संपूर्ण चमूचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन , मानवविज्ञान अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली,अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. शैलेंद्र देव आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.