Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..!

- मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई.दि. १९ जून:आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे.

कोरोनाचे संकट पाहता मा. उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार आहेत. हा पालखी सोहळा नेत्रदीपक तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ ” लालपरी” बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल ॲड. परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यासाठी संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आले आहेत. असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतूकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.

हे देखील वाचा

महिला रुग्णालयातील बालरुग्णांच्या वॉर्डच्या भिंती झाल्या विविध रंगात रंगून झाल्या बोलक्या!

मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.