Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

चंद्रपूर-मूल महामार्गावरील घटना .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भूषण बन्सोड,

चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून  दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा रस्ता पार करतांना वाहनाच्या धडकेत मृत्यु चे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे नैसर्गिक वन्य प्राण्यांचे  अधिवास नष्ट होत असतांना दुर्लभ होत चाललेल्या खोकड प्राण्याचा च्या अपघातात मृत्यू झाल्याने पुन्हा संख्येत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अश्यातच वन्यजीवांचे महामार्ग ओलांडताना असंख्य वन्यजीवांचे नाहक बळी, या मार्गावर जात असल्याने  वन्यजीवांसाठी उपशमन (अंडरपास) योजना रखडली आहे . खोकड ह्या प्राण्याचा अपघाती मृत्यूची हि पहिलीच नोंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर, 26 नोव्हेंबर :-  चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग -९३० वर दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मूल येथील सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना लक्षात आली.  त्यांनी स्थानिक संजीवनी पर्यावरण संस्थेचे उमेश झिरे यांना संपर्क केला. त्यांनी वन कर्मचारी व  हॅबिटॅट कॉन्झरवेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांना हा फोटो पाठवून खोकड Bengal Fox ( बेंगाल फॉक्स ) असल्याचे निष्पन्न केले.मराठीत खोकड ( शास्त्रीय नावः Vulpes bengalensis (व्हल्पिस बेंगॉलेन्सिस); इंग्रजी:Bengal Fox ( बेंगाल फॉक्स ) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे खोकड मोकळ्या मैदानात राहतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खोकड जातीचे हे प्राणी वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडपे असलेल्या भागात नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंवा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. खोकड हा लहान सस्तन प्राणी असून त्याचे खाद्य  सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक,पक्षी,साप आहे. उंदीर व खेकडे यांचा नाश करीत असल्यामुळे तो शेतकऱ्यांना हितकारक आहे. दिवसेंदिवस अधिवास नष्ट होत चालल्याने , खोकड च्या संख्येत घट होत असतांना दिसत आहे. हा महामार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर ) क्षेत्राला लागून जातो. चंद्रपूर प्रादेशिक व वनविकास महामंडळ हे जंगल क्षेत्र या महामार्गाला लागूनच आहे. म्हणून वन्यजीवांचे मार्ग ओलांडताना असंख्य वन्यजीवांचा नाहक बळी गेलेला आहे, तरीही अद्याप या मार्गावर वन्यजीवांसाठी उपशमन (अंडरपास) योजना रखडली आहे. खोकड ह्या प्राण्याचा अपघाती मृत्यूची हि पहिलीच नोंद आहे.

हे देखील वाचा :-

खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा अमलात

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.