Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोकण रेल्वे – गाड्यांचे बदललेले मार्ग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती कोसळत असल्याने या ठिकाणाहून होणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे . यामुळे सावंतवाडी ते मडगाव दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे . कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

यामध्ये 02618 हजरत निजामुद्दीन एरणाकुलम तसेच 04696 अमृतसर कोचुवली साप्ताहिक स्पेशल या दोन गाड्या पनवेल – कर्जत – पुणे – मिरज- हुबळी- शोरणुर मार्गे वळवण्यात आल्या आहेत. 02977 एरणाकुलम अजमेर , 09261 कोचुवली पोरबंदर आणि 01224 एरणाकुलम लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुरांतो द्विसाप्ताहिक या गाड्या मडगाव- लोंढा- मिरज- पुणे -कर्जत -पनवेल यामार्गे धावतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

01111 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या स्पेशल या गाडीच्या प्रवाशांना थिविम ते मडगाव पर्यंत रस्त्यामार्गे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली . 01114 मडगाव मुंबई मांडवी स्पेशल या गाडीच्या प्रवाशांना मडगाव ते थिविम रस्तामार्गे नेण्यात आले. 02432 हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस तसेच 02413 मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस या गाड्यांच्या प्रवाशांना पेडणे मडगाव पेडणे असे रस्तामार्गे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रद्द गाड्या –

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

19/7/21 रोजी सुटणारी 01112 मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस आणि 20/ 07/21 रोजी सुटणारी 01113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव पर्यंत धावणारी मांडवी एक्सप्रेस या गाड्या पूर्णता रद्द करण्यात आलेल्या आहेत.

कोकण रेल्वे – मार्ग बदल आणि रद्द गाड्या

मार्ग बदललेल्या गाड्या –
कोकण रेल्वेवर 19/07/21 सुटणारी
06345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस पनवेल – कर्जत -पुणे -मिरज- हुबळी- शोरणुर ह्या बदललेल्या मार्गावरून आणि पुढे नियमित मार्गावर धावेल .

हे देखील वाचा :

ठाणे मुंब्रा – शिळ ते पनवेल वाहतूकीसाठी अनिश्चित काळाकरता बंद!

ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका

नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित

 

Comments are closed.