Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

लातुर- शहरातील आनंदनगर भागातील एका तरुणीने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली आहे. आत्महत्येपुर्वी तिने सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याचा व्हीडीओ लाईव्ह केला होता.

                        मृत सोनी शेख (१९)

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१९ वर्षीय सोनी शेख असे मृत तरुणीचे नाव आहे. आई कामानिमीत्य बाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती. याच वेळेस तिने एक व्हीडीओ करुन इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर वायरल करुण तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

सदरील घटना घरमालकाने मुलीच्या आईला फोन करुन कळविली आणि दोन तरुणांनी सोनीने गळफास घेतलेल्या दोरीला कापून दवाखाण्यात घेवून गेल्याचे मुलीच्या आईला सांगीतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ते दोन तरुन मुलीला दवाखाण्यात सोडूण निघून गेल्याचे मुलीच्या आईने सांगीतले आहे. ती दोन मुले कोण होती, ते अद्याप कळू शकले नाही. मुलीच्या आईने मुलीसोबत काहीतरी झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगीतले आहे. सोनी शेख ही लातुर शहरातील एका महाविद्यालयात BA व्दितीय वर्षात शिकत होती.

पोलिसांनी योग्य ती चौकशी करुन मला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी मुलीच्या आईने पोलिसांकडे केली आहे. सदरिल घटनेबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

 

हे देखील वाचा :

मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.