Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा शासकीय रक्तपेढी गडचिरोली कडून मनोज पिपरे यांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आज दिनांक १७ जून २०२१ रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढी कडून मनोज पिपरे यांचा सत्कार करण्यात आला.

मागील ५ वर्षा पासून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना प्रत्येक वेळी धावत जाऊन रुग्णांना तात्काळ रक्त मिळवून देत आहे. सोबतच रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा भासत असताना वेळो-वेळी रक्तदान शिबिर घेऊन रक्तपेढी मधील रक्तसाठ्यात वाढ करण्यात मदत करणे, व या कोरोनाच्या काळात जास्तीत जास्त रक्तदाते आणून तात्काळ रुग्णांना रक्त मिळवून देत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्वांची दखल घेत रक्तपेढी गडचिरोली यांनी आज मनोज पिपरे यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी ड्रॉ. मद्यमवार (BTO), सतीश तडकलावार (PRO), शिक्षक पत्तीवार, कोल्लूरी, नरेश, विवेक, स्वप्नील, सुरज व निशाली हे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रसंगी ड्रॉ. मद्यमवार यांनी असेच कामे समोर करत राहावे व रक्तपेढी येथील ज्या-ज्या वेळी रक्ताची कमतरता भासेल तेव्हा आपण रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठ्यात वाढ करण्यात मदत करावी असे म्हटले.

या सत्काराचा मान जरी मला मिळालेलं असलं, तरी हे मान मी माझ्या सर्व रक्तदाते यांना अर्पण करीत आहे. माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक रक्तदाता माझ्या एका शब्दात रक्तदान करण्याकरिता येत असतो. त्यामुळेच मी प्रत्येक रुग्णाची रक्ताची गरज तात्काळ पूर्ण करत आहे. असंच प्रेम व सर्वांचे आशीर्वाद राहते तर मला सामोर काम करण्याची ऊर्जा मिळेल. आपण केलेल्या रक्तदान मुळे एखाद्याचे जीव वाचवू शकतो. त्यामुळे सर्वानी रक्तदान करावे.

 – मनोज पिपरे जिल्हा स्वयं रक्तदाता समिती, गडचिरोली

हे देखील वाचा 

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा

चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

Comments are closed.