Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

प्राण्यांमधील दुर्मिळ घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर डेस्क, दि. ५ जुलै : गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काळ्या रंगाचा बिबट्या आणि त्याच्या सोबत जंगलात विहार करणारी मादी एकत्र दिसून आला आहे. रंग ठरविणाऱ्या ग्रंथींमध्ये बदल झाल्याने हा काळ्या रंगाचा बिबट्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बगिरा सोबतच मादी बिबटही जंगलात विहार करताना दिसून आली आहे. नवेगाव नागझिरा अभयारण्यात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्येही हे दोघे एकत्र आढळून आल्याने कुतुहल वाढले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कर्नाटक राज्यातील काबिनी अभयारण्यात पाच वर्षांपूर्वी अशाच एक काळ्या रंगाच्या बिबट्याची नर- मादी जोडी सर्वांत पहिल्यांदा आढळून आली होती. साया (नर) आणि क्लिओ (मादी) ही जोडी त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. वाईल्डलाईफ फोटोग्राफर शाहज जंग यांनी तयार केलेली ही विशेष डॉक्युमेंट्रीही त्यावेळी बरीच गाजली होती.

त्यामुळे प्राण्यांमध्येही रंग तयार करणाऱ्या पेशींमध्ये होणारे म्युटेशन चर्चेत आले होते. माणसांमध्ये ज्याप्रमाणे त्वचेच्या खालील रंग ठरविणाऱ्या ग्रंथींमध्ये बदल होऊन त्वचेचा रंग बदलतो, त्याच प्रमाणे प्राण्यांमध्येही रंग ठरविणाऱ्या पेशींमध्ये हे म्युटेशन पहायला मिळाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यापूर्वी विदर्भातील २०१९-२० मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पातही एकट्याने फिरणारे काळे बिबटे आढळले होते. मात्र नवेगाव-नागझिरा अभयारण्यात पहिल्यांदाच काळ्या रंगाच्या बिबट्या सोबत सामान्य दिसणारी मादी बिबटही आढळून आली आहे. काळ्या रंगाच्या बिबट्या सोबत मादी आढळण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

त्यामुळे कॅमेरा ट्रॅपिंमधला हा डेटा नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह प्रकल्पाने नोंद केला असून तो डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठविण्यात आला आहे. नागपूर येथील वाईल्ड लाईफ संशोधक बिलाल हबीब यांनी देखील आपल्या ट्विटर हॅँडलर अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्रिटरवरून शेअर केलेल्या चित्रात नागझिरा नावेगाव टायगर रिझर्व्ह लँडस्केपचा उल्लेख केला आहे. मात्र ही नर-मादी जोडी नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळली याचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे.

या फोटोत दिसलेल्या बिबट्याच्या जोडीमुळे ५० हजार ५०० चौरस किलोमीटर पसरलेले नवेगाव- नागझिरा अभयारण्य पुन्हा एकचा चर्चेत आले आहे. या बिबट्याच्या जोडीचा पत्ता लावण्यासाठी वन्यप्रेमी उत्सूक आहेत. परंतु पावसाळ्यामुळे जंगल सफारी बंद पडल्याने काही जण निराश झाले आहेत.

हे देखील वाचा : 

धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन

भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा – त्रिवेणी व्यापारी संघटना

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.