Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा – त्रिवेणी व्यापारी संघटना

भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करण्याकरीता त्रिवेणी व्यापारी संघटनेनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.

  • केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच पुनर्वसन करू राजेंनी व्यापाऱ्यांना दिली ग्वाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीवर केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरण कडून उंच पुलाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे, त्या पुलाचा पोचमार्गासाठी भामरागड येथील मुख्य मार्गावरील १२४ दुकानदारांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, परंतु अद्याप त्या कारवाईला प्रशासनाकडून सुरवात झालेली नाही, लवकरात लवकर संपूर्ण बाजारपेठेचे नवीन सुरक्षित जागेवर पुनर्वसन करा ह्या प्रमुख मागणीसाठी गेल्या ५ दिवसांपासून भामरागड कडकडीत बंद आहे, तसेच व्यापारी संघटनेकडून उपोषणालाही सुरुवात करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल भामरागड येथे जाऊन त्रिवेणी व्यापारी संघटना तथा गावकऱ्यांसोबत एक बैठक घेऊन तब्बल दीड तास सविस्तर चर्चा केली.

यावेळी व्यापाऱ्यांनी हा पुनर्वसनाचे काम तुम्हीच करू शकता, इतरांना हे काम जमणार नाही. यामुळे तुमच्याकडून आम्हाला मोठी अपेक्षा आहे. असे सांगितले. यावर तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या विषयांवर पाठपुरावा करून लवकरच संपूर्ण बाजारपेठेचे पुनर्वसन करू अशी ग्वाही राजे अम्ब्रिशराव यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना आणि गावकऱ्यांना दिली, यावर व्यापारी संघटनेने समाधान व्यक्त करीत जोरदार टाळ्या वाजवून तथा घोषणाबाजी करीत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना दाद दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यानंतर राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यापारी तथा गावकऱ्यांसह नवीन पुलाचे काम तथा बाजारपेठ पुनर्वसनासाठी प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या जागेची पाहणी करून पूर्ण माहिती घेतली.

यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, त्रिवेणी व्यापारी संघटना, भामरागडचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, जाधव हलधर सह अनेक व्यापारी तथा भामरागड येथील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

गडचिरोली भाजपा तर्फे लोकशाही बचाव दिन साजरा करुन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन सादर

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन

धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!

 

Comments are closed.