Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक बेळगाव विमान सेवेचा ना. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दि. २५ जानेवारी: केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या नाशिक ते बेळगाव या विमानसेवे चा शुभारंभ राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणी फीत कापून करण्यात आला उडान योजनेअंतर्गत लहान-मोठ्या शहरात जोडणाऱ्या योजनेमध्ये बंगलोर दिल्ली हैदराबाद पुणे आणि आता बेळगाव ही शहरे नाशिकशी हवाईमार्गाने जोडण्यात आली आहेत.

कंपनीद्वारे नाशिक बेळगाव विमान सेवा दर सोमवार शुक्रवार आणि रविवारी देण्यात येणार असून नाशिक ते बेळगाव प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाचा आहे नाशिक ते बेळगाव हवाई भाडे 1999 रुपये एवढी आहे. Ambarat 145 प्रकारच्या विमानात 50 व्यक्तींसाठी असंन क्षमता असून या उद्घाटन समारंभाला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे दिंडोरीच्या खासदार भारती पवार तसेच स्टार एअर चे  जनरल मॅनेजर सी ए बोपन्ना  नाशिक उद्योजक संघटनेचे  आशिष रावल आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभात बोलताना आमदार छगन भुजबळ म्हणाले की हवाईमार्गाने विविध शहरे जोडले गेल्यामुळे नाशिकमधील औद्योगिक क्षेत्राच्या आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला असून नाशिक आणि शिर्डी हे दोन्ही विमानतळ हवाई अंतरात अतिशय जवळ असून इतक्या जवळच्या अंतरामध्ये विमानतळ असणारे नाशिक हे महत्त्वाचे ठिकाण बनणार आहे.  कोरोना काळातही नाशिक विमानतळावर 2 लाख प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला पूर्वी प्रवासी नाही म्हणून विमान सेवा बंद पडत असे  आता एअरलाईन नाशिकहून देशातील महत्वाच्या शहरांना 8 फ्लाईट द्वारे विमान सेवा देत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.  असे खा. भारती पवार म्हणाल्या राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दांपत्याला पहिला बोर्डिंग पास ची प्रतिकृती देऊन   बोर्डिंग पासचे उदघाटन करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.