Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील नागदेवता मंदिरा नजीक कार आणि ट्रकच्या आमने सामने झालेल्या अपघातात कारमधील एक गंभीर तर दोन जखमी झाले आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्तीसगड येथील जगदलपुर वरून सागर पदमतीनटीवार हे आपल्या परिवारासह चंद्रपूरला एका नातेवाईकाकडे वास्तूच्या कार्यक्रमाला फोर्ड कार क्र. सी. जी. १७ के. ई ३७०० ने निघाले होते. आलापल्ली पासून ६ किमी अंतरावर नागदेवता मंदिरानजीक आलापल्ली-सिरोंचा मार्गे कर्नाटक येथे जाणाऱ्या ट्रक क्र. टी.एन. ५२ जे. ९३५७ ला भरधाव कार ने सामोरा-समोर धडक दिली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की, कार रोड सोडून नजीकच्या जंगलात १० फुट आत मध्ये जाऊन घुसली. या अपघातात कारचालक सागर पदमतीनटीवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी व एक लहान बाळ जखमी झाले असून त्यांना आलापल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कारचालक सागर यांना डोक्याला व हाता पायाला जबर मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. अशी माहिती आहे.

सदर अपघाताचा पुढील तपास अहेरी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी करीत आहे.

हे देखील वाचा :

राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोनामुक्त तर 19 नवीन कोरोना बाधित

वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.